कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ५ जण गंभीर, लहान मुलीचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महोबा । उत्तर प्रदेशातील महोबामध्ये कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील पाच लोक आजारी पडले आहेत. उलट्या आणि अतिसार झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महोबा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील प्रत्येकावर महोबा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातू विषबाधा झाली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे.

https://hellomaharashtra.in/other/health/coronavirus-outbreak-nyc-government-organisation-says-you-should-masturbate-dmp/

हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना महोबामधील पनवाडी या भागातील अग्निहोत्रीपुरा मोहल्ला येथे घडली. जिथे नरेंद्र, त्यांची पत्नी मीरा आणि तीन मुलांनी कलिंगड खाल्ल्यानंतर सर्वांना पोटदुखी होऊ लागली. नरेंद्र व्यवसायाने जेवण बनविण्याचे काम करतो पण लॉकडाऊनमुळे त्यांना काम मिळत नव्हते. असे म्हटले जात आहे की भूक भागवण्यासाठी त्याने स्वतः कलिंगड खाल्ले. तसेच त्याने तो आपली पत्नी आणि मुलांनाही दिला.

https://hellomaharashtra.in/other/health/is-coronary-medicine-hidden-in-the-deep-sea-see-what-the-researchers-are-saying/

मात्र कलिंगड खाल्ल्यामुळे नरेंद्र, त्याची पत्नी मीरा आणि मुलांची प्रकृती खालावू लागली. उलट्या, अतिसाराचा त्रास झालेल्या या कुटुंबाला रुग्णवाहिकेतून पानवाडी आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे नरेंद्र यांची मुलगी वर्षा हीची प्रकृती गंभीर बनली आणि तिने प्राण सोडले. उर्वरित चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना महोबा जिल्हा रुग्णालयात हलवले. तिथे उर्वरित चौघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की अन्नातील विषबाधामुळे हे सर्वजण आजारी पडले.

https://hellomaharashtra.in/other/health/another-great-crisis-on-earth-a-hole-in-the-weight-layer/

कलिंगडातून विषबाधा होऊ शकते का?
कलिंगड गोड आणि रंगीबेरंगी बनविण्यासाठी कधीकधी त्यामध्ये केमिकल, सॅकरिन आणि रंगीत द्रावण टाकले जाते. अशा कृत्रिम रंग आणि केमिकलमुळे कलिंगड विषारी असू शकतो जे खाल्ल्यानंतर आरोग्यास हानी पोहोचू शकते. मात्र याचा अर्थ असा नक्कीच होत नाही कि सर्व कलिंगडातुन विषबाधा होऊ शकते. तेव्हा या घटनेची भीती मनात धरून कलिंगण घायचे सोडू नका. मात्र कलिंगड विकत घेताना ते व्यवस्थित पारखून घ्या. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड खाणे आरोग्यास फायद्याचे असून त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान स्थिर राहण्यास मदत होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

https://hellomaharashtra.in/other/health/what-is-connection-between-bats-coronavirus-icmr-report/

Leave a Comment