कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
लग्नावरून मुलगा अथवा मुलगीच्या कुटूंबियांची फसवणूक केल्याचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. लग्न लावून देऊन युवकाची फसवणूक केल्याने पाच जणांवर विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने विट्यासह खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. युवतीशी खोटे लग्न लावून चक्क युवकाची पाच जणांनी फसवणूक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील कुंभार गल्लीमधील गणेश बबन कुंभार या युवक गणेश बबन कुंभार व त्याच्या कुटुंबियांकडून लग्नासाठी प्रयत्न केले जात होते. या दरम्यान खानापूर तालुक्यातील सुलतानगादे येथील वर्षा बजरंग जाधव, खटाव तालुक्यातील आंबवडे येथील हिंदुराव पवार, सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे यांनी गणेश याची भेट घेतली. सर्व चर्चा झाल्यानंतर त्याचे स्वाती (पुर्ण नांव माहित नाही) हिच्याशी लग्न लावून देण्यासाठी संबंधित पाच जणांनी गणेशाकडे रक्कमेची मागणी केली. त्यानंतर गणेशनेही त्यांना रोख दोन लाख रुपये, एक तोळे सोने आणि साडेतीन भाराचे चांदीचे दागिने दिले. त्यानंतर काही दिवस झाल्यानंतर ते पसार झाले.
या प्रकरणी गणेश कुंभार याने संबंधित पाच जणांविरोधात विटा पोलिसांत तक्रार दिली. गणेशच्या तक्रारीनूसार पाेलिसांनी वर्षा बजरंग जाधव ( सुलतानगादे, ता. खानापूर ), हिंदुराव पवार (आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा ), स्वाती ( पुर्ण नांव माहित नाही ), सरीता प्रदिप पवार, दशरथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.