अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा -“भारताची GDP वाढ आर्थिक वर्ष 2022 मध्ये दुहेरी अंकांच्या जवळ असेल”

0
171
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे की, भारत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. देश चालू आर्थिक वर्षात GDP च्या दोन अंकी वाढीकडे वाटचाल करत आहे. त्या म्हणाल्या की,”2022 या आर्थिक वर्षात देशाची आर्थिक वाढ 7.5 टक्के ते 8.5 टक्के राहील. पुढील दशकभर हा आर्थिक विकास दर कायम राहील यावर त्यांनी भर दिला.”

‘भारताचा आर्थिक विकास दर जगात सर्वाधिक असेल’
अर्थमंत्री सीतारामन यांनी हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये संभाषणादरम्यान सांगितले की,”या वर्षी आपण भारताचा आर्थिक विकास दर दुहेरी अंकांच्या आसपास पाहत आहोत, जो जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक असेल. त्याच वेळी, या वर्षाच्या आधारावर, पुढील आर्थिक वर्षात GDP वाढ 8 टक्के असेल.”त्या म्हणाल्या की,, आतापर्यंत अर्थ मंत्रालयाने वाढीच्या आकड्यांबाबत कोणतेही मूल्यांकन केलेले नाही. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेसह अनेक रेटिंग एजन्सीजच्या मूल्यांकनानुसार, 2022 च्या आर्थिक वर्षात भारत दुहेरी अंकी वाढ साध्य करेल.”

‘उदयोन्मुख अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करतील’
केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या की,”भारताच्या प्रमुख उद्योगांमध्ये सध्याच्या विस्ताराचा दर पाहता पुढील दशकात आर्थिक विकास दर 7.5 टक्के ते 8.5 टक्क्यांच्या दरम्यान राहील, त्यासाठी त्याच्या घसरण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही.” त्याच वेळी, जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भात, त्या म्हणाल्या की,” संपूर्ण जगासाठी एकच मानक असू शकत नाही. उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत आहेत. त्यांनी स्थिर वाढ नोंदवणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये इतकी क्षमता आहे की ते त्यांच्याबरोबर जागतिक अर्थव्यवस्था देखील पुढे नेतील.”

पहिल्या तिमाहीत वास्तविक GDP वाढ 20.1% आहे
दरम्यान PHDCCI या औद्योगिक संघटनेने म्हटले आहे की,” भारतीय अर्थव्यवस्था 2021-22 या आर्थिक वर्षात 10.25 टक्के GDP वाढ साध्य करू शकते.” PHD चेंबरचे म्हणणे आहे की,” रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकारच्या प्रभावी धोरणांमुळे आणि व्यावसायिक भावनांमध्ये सुधारणा झाल्यामुळे हे होईल. त्याच वेळी, रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक वाढीचा अंदाज 9.5 टक्के ठेवला.” राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 31 ऑगस्ट रोजी म्हटले होते की, “आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत देशाची खरी GDP वाढ 20.1 टक्के आहे. RBI ने पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 17.2 टक्के GDP वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here