आयपीएल स्पर्धेला पाकिस्तानचा खोडा; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. अशात आयपीएल स्पर्धा होईल नाही याची सर्वांना काळजी लागली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलून आयपीएलचे आयोजन करावी असे मत अनेक जण व्यक्त करत आहेत. फक्त भारतच नाही तर अन्य देशातील क्रिकेटपटूंची इच्छा आहे की आयपीएल स्पर्धा व्हावी. यासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात काही बदल करावे लागले तरी हरकत नाही, असे अनेकांचे मत आहे. अशात पाकिस्तानने भारताला धमकी दिली आहे. आयपीएल स्पर्धेसाठी आशिया कप स्पर्धेच्या नियोजनात कोणताही बदल करू देणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी म्हटले आहे.

आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात दुबई मध्ये होण्याची शक्यता आहे. दुबईत स्पर्धा खेळवण्यास पाकिस्तानची तयारी असल्याचे दिसते. आशिया कप स्पर्धा सप्टेंबर महिन्यातच होणार असल्याचे वसीम खान यांनी स्पष्ट केलं आहे. आरोग्य विषयक सुरक्षेचे कारण वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या स्पर्धेची वेळ बदलली जाणार नाही. आम्ही आयपीएलसाठी आशिया कपची वेळ देणार नसल्याचे वसीम खान यांनी जीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

पाकिस्तानकडून अशा प्रकारची धमकी देण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान, यासंदर्भात बीसीसीआयने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अधिकाऱ्यांच्या मते आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात मिळणाऱ्या काळात होऊ शकते. गुरुवारी आयसीसीच्या मिटिंगमध्ये बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयपीएलच्या नियोजनाबद्दल काहीच उल्लेख केला नसल्याचे वसीम खान म्हणाले.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला “HelloNews.”

Leave a Comment