देशात पहिल्यांदाच होणार गाढवाच्या दुधाची डेअरी

0
63
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत आपण अनेक वेळा गाय , मैह्स याच्या दुधाची डेअरी पहिली असेल. पण गाढवाच्या दुधाची डेअरी कधी पहिली पण नसेल आणि ऐकली पण नसेल. आतापर्यंत आपण अनेक प्राण्याच्या दुधाचा वापर केला असेल पण गाढवाच्या दुधाचा वापर केला जातो हे माहिती नसेल पण गाढवाचे दूध आता चक्क डेअरीत मिळणार आहे. त्यासाठी वेगळी डेअरी तयार केली आहे. गाढवाच्या दुधाचा वापर हा शरीरातील इम्युनिटी शक्ती वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अनुसंधान केंद्र हरियाणा हिसार मध्ये गाढवाच्या दुधाचा साठा केला की जाणार आहे. हरियाणामध्ये हिलानी नावाच्या जातीच्या १० गाढवाचा समावेश असणार आहे. गुजरात मधून हि गाढवे मागवली आहेत. या दुधाची किंमत एका लिटर मागे पाच ते सात हजार एवढी आहे. ब्रीडिंग नंतर या दुधाचा वापर केला जाणार आहे. या दुधापासून अनेक महागडे प्रॉडक्ट्स तयार केले जात आहेत. त्याचा वापर हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी , कॅन्सर , ऍलर्जी या आजरांपासून बचाव होतो. गाढवाचे दूध हे औषधाचा खजाना मानला जातो.

कोणतेही साईट इफेक्ट नाहीत

प्रोजेक्ट साठी काम करणाऱ्या डॉक्टर डॉक्टर अनुराधा भारद्वाज यांनी सांगितलं आहे कि, लहान मुलांना अनेक वेळा साध्या दुधामुळे ऍलर्जी होते. पण गाढवाच्या दुधामळे मुलांना कोणताही त्रास होत नाही किंवा कोणताही साईट इफेक्ट होत नाही. या दुधामध्ये अँटी ऑक्सिडंट, तसेच अँटी इंजीन हे तत्व असतात. यामुळे गंभीर आजाराविरोधात लढण्याची क्षमता या दुधातून मिळते. गाढवाच्या दुधापासून अनेक पार्लर चे प्रॉडक्ट तयार केले जात आहेत. लीप बाम, साबण , बॉडी लोशन तयार केले जाते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here