कार-बाईक-स्कूटरच्या सुरक्षेसाठी लावा ‘ही’ खास नंबर प्लेट

0
103
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आता आपल्या सर्वांकडे या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटशी संबंधित अनेक प्रश्न असतील. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया. जर आपण आपल्या कारवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावलेली नसेल तर आजच लावून घ्या. कारण आपले वाहन चोरीलाही गेले तर ते सापडू शकेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. मात्र ते दिल्लीत.

जर गाडीवर नंबर प्लेट दिसत नसेल, तर पोलिसांकुन दंड आकारले जातात. आता आपल्या सर्वांकडे या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) शी संबंधित अनेक प्रश्न असतील. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया. HSRP अॅल्युमिनियम प्लेटच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात अशोक चक्रचे क्रोमियम-आधारित ब्लू हॉट स्टॅम्प होलोग्राम आहे. प्लेटच्या खाली डाव्या कोपऱ्यात 10-अंकी लेझरने कोरलेला पिन चिन्हांकित केलेला आहे. तसेच या नंबर प्लेटचे कोनो गोलाकार असतील.

ही विशेष नंबर प्लेट आपली वाहने अधिक सुरक्षित करतात. HSRP ला स्नॅप-ऑन-लॉकच्या द्वारे वाहनात बसवले जाते. यामुळे नंबर प्लेट काढली जाऊ शकत नाही. जर आपली कार चोरीला गेली असेल तर ती HSRP सह ट्रॅक केली जाऊ शकते. सहसा कार चोरीनंतर नंबर प्लेट्स बदलल्या जातात. HSRP बसवल्यानंतर ते शक्य होणार नाही. वाहन चोरल्यास 10-अंकी पिन, जो आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटवर आहे, तो ट्रॅक करण्यासाठी बदलला जाऊ शकत नाही. या मदतीने आपल्या वाहनाचा मागोवा घेतला जाऊ शकतो.

HSRP ची किंमत वेगवेगळ्या राज्यात बदलू शकते. दुचाकी वाहनांसाठी एचएसआरपीची किंमत 400 रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनासाठी सुमारे 1100 रुपयांपर्यंत असू शकते. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात एचएसआरपी अनिवार्य करण्यात आलेय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here