नात्याला काळिमा ! 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये साकिनाका बलात्कार प्रकरण ताजे असताना मुंबई नजीक असलेल्या भिवंडीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर 48 वर्षीय काकाने बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने तिच्यावर अत्याचार केला आहे.

याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 376 सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम काकाला अटक केली आहे. भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह राहते. त्याचा गावात हा नराधम काकासुद्धा राहतो. काही दिवसांपूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र, या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असताना हा सगळा प्रकार समोर आला आहे.

यानंतर पीडितेच्या कुटुंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर नराधम काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी या नराधम काकाचा शोध सुरु केला असता त्याला भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक करण्यात आली.