हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून महाविकास आघाडीवर वारंवार निशाणा साधला जातो. कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून तर कधी नुकसान भरपाई प्रशनांवरून. मात्र, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद आपल्याला मिळण्याबाबतची इच्छा, मन कि बात पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. “मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही. आणि मलाही जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
नवी मुंबई येथे आज महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ पार पडला. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फडणवीस म्हणाले की, मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे.”
Live | महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभ | नवी मुंबई @mandamhatre https://t.co/fkMGgkAI3U
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2021
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहार. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चाना चांगलेच उधाण आले आहे. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारकडून आता टोलेबाजी केली जाणार यात काही शंका नाही.