मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू; काँग्रेस नेते रावत यांचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात अनेक नेत्यांकडून खळबळजनक, आश्चर्यकारक विधाने केली जातात. विधाने केल्यानंतरही त्यांना याचे फारसे काही वाट नाही. असेच आश्चर्यकारक विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी केले आहे. मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सांगतो, असे रावत यांनी म्हंटले आहे.

उत्तराखंड 2021 चा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी रावत यांनी हे खळबळजनक विधान केले. यावेळी ते म्हणाले की, “मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाने मला काही दिले नाही तरी मी माझ्या मनातील गोष्ट परखडपणे सांगतो. माझ्या सुरक्षेसासाठी मला कुठे जाण्याची गरज नाही.

जेव्हा कधी मी माझ्या नेतृत्वासमोर उभा राहिलो माझी राजकीय सुरक्षा परत मिळाली. त्यामुळे माझा बालिका वधूचा जो स्टेटस आहे, तो मी का सोडेन? आणि तोही फक्त एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी?” काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन, असेही हरिश रावत यांनी यावेळी सांगितले.