हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरू झाल्या तरी काही ठिकाणी अद्याप एसटी बसेस सुरू नसल्याने शाळेतील मुलांना पाणी चालत जावे लागत आहे. यावरून माजी मंत्री तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यांची तर शाळाचं बुडत आहे. बरं झालं अस्त मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं अस्त, असा टोला खोत यांनी लगावला आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करीत एसटी कर्मचारी संप, शाळेसाठी मुलांना करावी लागणारी पायपीट या प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आता शाळा सुरू झाल्या आहेत. बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यांची तर शाळाचं बुडत आहे. बरं झालं अस्त मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं अस्त, असे ट्विट करीत खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
शाळा सुरू झाल्या…..
बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत..
लांबच्यागावाच्यांची तर शाळाचं बुडत आहे.
बरं झालं अस्त मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं अस्त.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 21, 2021
राज्यात एकीकडे शाळांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीवरून अद्यापही संप सुरु आहे. त्यांच्या संपामुळे विद्यार्थांना शाळेवर जात येत नसल्याने त्यांचे हाल होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या नुकसानीवरून माजी मंत्री खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.