हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपावरील एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे. यावरून शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला. या सरकावर व परिवहनमंत्र्यांवर एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. अनेक मार्गाने आघाडी सरकारकडून कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. या आघाडी सरकारचा भोंगळ कारभार संपता संपेना, अशी टीका खोत यांनी केली आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात अद्यापही काही एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. तर काहीजण कामावर हजर झालेले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना फक्त धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा या सरकावर आता विश्वास राहिलेला नाही. या सरकारने सर्वच गोष्टीत भ्रष्टाचार केला आहार.
दरम्यान काल परिवहनमंत्री अनिल परब यांनी आम्ही कामावर न परतलेल्या सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना करणे दाखवा हि नोटीस पाठवणार असून त्यानुसार राज्य सरकारकडून या नोटीशीनंतर संपावरील कर्मचाऱ्यांना 8 दिवसांची मुदत देत आहोत. दि. 20 तारखेला कोर्टाची तारीख आहे, त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल, तोपर्यंत कामावर यावे, असे परब यांनी सांगितले आहे.