सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
भारतीय जनता पक्षाने आमच्या संस्थाना पुर्न उभारणी साठी कोणतीही मदत केली नाही. त्याच बरोबर वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ आश्वासने दिली. त्यामुळे आम्ही शिराळा मतदार संघातील 48 हजार समर्थक व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचे व सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. तसेच मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
यावेळी बोलताना नाईक पुढे म्हणाले,” दुर्दैवाने आमच्या संस्था आर्थिक विस्कळीत झाल्या. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी या बाबत आग्रह धरला याला प्रतिसाद मिळाला नाही. आमच्या दृष्टीने ते दुर्दैव होते. पक्षाच्या वतीने पुनर बांधणी मदतीची मागणी केली ती ही मिळाली नाही. शिराळा तालुक्यातील भाजपचे 21 गावांचे सरपंच, 8 गावातील आघाडी चे सरपंच, 219 ग्रामपंचायत सदस्य, तसेच वाळवा तालुक्यातील 8 गावातील सरपंच, आघाडी चे 9, तर 137 ग्रामपंचायत सदस्य यानी भाजपा चे राजीनामे दिले.”
334 बुथ सदस्यानी, 84 शक्ती केंद्र, 14 आघाड्या, 13 सेल, 2100 पदाधिकारी यांनी तसेच शिराळा नगरपंचायत च्या काही सदस्यांनी तालुका अध्यक्ष यांनीभाजप चा राजीनामा दिला. आर्थिक संकटात सापडलेल्या संस्थाना सर्वोतोपरी मदत करण्याची हमी जिल्हा तसेच राज्य पातळीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंग नाईक यांनी दिली या मुळे आम्ही सर्व कार्यकर्ते सह राष्ट्रवादी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.