माजी खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं ; सचिन सावंतांचा गंभीर आरोप

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं खा. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

ज्यांच्यावर सगळ्या देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे. त्या संसदेच्या सातवेळा सदस्य असणाऱ्या माजी खासदार मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती.

त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खा. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here