पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला झाली कोरोनाची बाधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद । पाकिस्तानात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूला याची लागण झाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ”गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली आहे. मला फार वेदना होत असून, दुर्दैवानं कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे,” असे ट्टीट आफ्रिदीने केले आहे.

जागतिक क्रीडा क्षेत्रात आणि क्रिकेटमधील काही खेळाडूंना याआधी कोरोनाची लागण झाली होती. पण एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला करोना व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदी आणि भारतावर आगपाखड करणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर कठोर टीका करण्यात आली होती. आफ्रिदीने काश्मीर संदर्भात देखील भारतावर टीका केली होती. भारतातील क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment