Thursday, March 30, 2023

भारताचे पूर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

नवी दिल्ली । भारताचे पूर्व राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रणब मुखर्जी यांनी ट्विट करू याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय गेल्या आठवडाभरात संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रणब मुखर्जी यांनी विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती केली आहे.

प्रणब मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं कि, ”आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे.”

- Advertisement -

भारतात कोरोना संक्रमचे प्रमाण वाढलं असून सामान्य लोकं बरोबर राजकीय व्यक्तींना सुद्धा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जलसंपदा मंत्री अर्जुन मेघवाल हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”