सिगरेटमुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होऊ शकतो? फ्रांसमध्ये संशोधन सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील संशोधक कसोशीने प्रयन्त करत आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसपासून जगाला मुक्त करण्यासाठी लस निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. यातून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. अशाच एका प्रयोगानुसार सिगारेटमध्ये असणारा निकोटिन हा घटक कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरु शकतो का? या दृष्टीने आता संशोधन सुरु आहे. निकोटिनमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव होऊ शकतो, ही बाब फ्रान्समधल्या संशोधनातून समोर आली आहे.

पॅरिसमधील एका मोठया रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ३४३ रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर संशोधक या निष्कर्षावर आले आहेत. या ३४३ रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले १३९ रुग्ण होते. तसेच फ्रान्समध्ये जवळपास ३५ टक्के नागरिक धूम्रपान करतात. पॅरिसच्या रुग्णालयात दाखल असलेल्या करोना बाधितांपैकी फक्त ५ टक्के रुग्णांना सिगरेट ओढण्याची सवय आहे. फ्रान्समधल्या संशोधकांचा अभ्यास मागच्या महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीशी साधर्म्य असलेला आहे.

काय आहे निकोटिनचा वापर करण्यामागची थिअरी
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी, उपचारांमध्ये निकोटिन या पदार्थाचा उपयोग करता शकतो का? यासाठी फ्रान्समध्ये आणखी काही चाचण्या करण्यात येणार आहेत. निकोटिन पेशींना चिकटून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हायरसचा पेशींमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होतो आणि करोना शरीरात फैलावण्याचा प्रश्नच उदभवत नाही. निकोटिनचा वापर करण्यामागे ही थिअरी आहे. आणखी क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी संशोधक फ्रान्समधील आरोग्य यंत्रणेच्या परवानगीची वाट पाहत आहेत. निकोटिनद्वारे करोनाचे संक्रमण रोखता येऊ शकते का? हे तपासण्यासाठी पॅरिस येथील हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवकांवर निकोटिन पॅचेसचा वापर करण्याची योजना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

20200424_173909.gif

 

Leave a Comment