Wednesday, March 29, 2023

‘तारक मेहता’ मधील हे कलाकार करतायेत एकमेकांना डेट

- Advertisement -

 मुंबई|गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांनी पेक्षकांच्या मनात जागा केली आहे.या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानी व गोलूची भूमिका साकारणारा कुश एकमेकांना सद्या डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Palak Sidhwani aka Sonu opens up ...

- Advertisement -

या मालिकेतील सोनू म्हणजेच पलकने नुकताच सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला आहे. यावेळी तिने चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली आणि त्या प्रश्नांची उत्तरं ही दिली. यात एका चाहत्याने तिला गोलूविषयी प्रश्न विचारला. यावर पलक म्हणाली, वेडे आहात का? कुश माझा खूप चांगला मित्र आहे.’ मालिकेतील टप्पूसेना प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत असते. या टप्पूसेनेची चाहत्यांशी ऑफस्क्रीनसुद्धा चांगली मैत्री आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: Is Palak Sidhwani aka Sonu dating ...

प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी ही मालिका कधीही पाहिली तरी कंटाळवाणं वाटत नाही. त्यामुळे अनेक लोक ही मालिका आवडीने पाहतात. असं या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. मग ते लहान असो किंवा मोठे. या कलाकारांमध्ये ऑफस्क्रीन ही चांगली गट्टी जमली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.