1 फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक; पुण्यात बिल्डरवर गुन्हा दाखल

fraud
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । एकच फ्लॅट अनेक जणांना विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याबाबत चंदन नगर पोलीस ठाण्यात सुप्रीम होल्डिंग्ज अँड हॉस्पिटॅलिटी (इंडिया) लिमिटेडच्या विदीप जाटियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष महादेव माळी असं फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे.

मनीष माळी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, 2016 मध्ये त्यांनी बेलमॅक रेसिडेन्स, कल्याणीनगर, पुणे येथे 1 कोटी 11 लाख 54 हजार रुपयांना फ्लॅट खरेदी केला. त्यावेळी जमिनीचे नाव स्पष्ट नसल्याने हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र या प्रकल्पाशी संबंधित अडचणी आणि त्यावर सुरु असलेल्या खटल्यांबद्दल आम्हांला काहीही सांगितले नाही.

प्रकल्प पूर्ण होण्यास बराच उशीर झाल्यानंतर, ज्या लोकांनी आपल्या कष्टाचे पैसे फ्लॅट खरेदी करण्यासाठी गुंतवले होते, त्यांना समजले कि एक फ्लॅट अनेक खरेदीदारांना विकला गेला आहे. हा प्रकार समजताच फ्लॅट खरेदीदारांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही गोष्ट उघडकीस येताच मनीष माळी यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांनी कोणतीही जागा किंवा फ्लॅट खरेदी करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.