तारण ठेवलेला माल परस्पर विकून बँकेला २३ कोटींचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

 कोल्डस्टोरेज मध्ये बँकेकडे तारण म्हणून ठेवलेला हळद व बेदाणा बँकेच्या संमतीशिवाय परस्पर विकून बँकेची २३ कोटी १२ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक विजयकुमार ज्उपाध्याय यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी कंपनीच्या मुंबईतील २ प्रतिनिधींसह ८ कोल्डस्टोरेज चालकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

 काही ‘शेतकऱ्याना कोल्डस्टोरेजच्या माध्यमातून कोल्डस्टोरेज चालकांनी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून २३ कोटी १२ लाख ७४ हजाराचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. मुंबईच्या सीएनएक्स कंपनीने करार केला होता. करण्यात आलेल्या करारात बँकेच्या संमतीशिवाय माल विकायचा नाही असा समावेश होता. दीपक गुरव, पवनकुमार उपाध्ये, लखमगोंडा पाटील हे विवीध कोल्ड स्टोरेजचे भागीदार आहेत. त्याचप्रमाणे रुपाली शेडबाळे, प्रद्द्यूमन पाटील, राहुल मित्तल, अनिल सुगन्नावर, जयपाल शिरगावे तसेच मुंबईमधील नरिमन पॉईंट येथे असणाऱ्या सीएनएक्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती निरुपमा पेंडुरकर, आणि कंपनीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अजित जाधव या सर्वांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्डस्टोरेजमधील हळद व बेदाणा बँक ऑफ बडोदाकडे तारण होता. त्या मालावर बँकेने शेतकऱ्यांना कर्ज दिले होते. बँकेच्या संमतीशिवाय कोणताही माल विकायचा नाही असा करार झाला होता. तरीही बँकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मालाची परस्पर विक्री करून बँकेची २३ कोटी १२ लाख ७४ हजाराची फसवणूक केली आहे. सदरची घटना नोव्हेंबर २०१७ ते मे २०१८ याकाळात घडली होती. बँकेने कर्जाचे हप्ते भरण्याबाबत वारंवार सूचना करूनही हप्ते न भरले गेल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोल्डस्टोरेज ची तपासणी केली असता त्याठिकाणी माल नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हि बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बँकेच्या सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक विजयकुमार उपाध्याय यांनी वरील सर्वांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचीतक्रार दाखल केली त्यानुसार दहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment