हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे गर्दी आणि गर्दीतील भांडण ही काही नवीन नाहीत. मागील काही दिवसांपूर्वीच काही महिलांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ते कमी कि काय म्हणून आता पुन्हा एकदा मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काय घडलं आहे नेमक जाणून घेऊयात.
काय घडलं?
मुंबई लोकल मधून प्रवास करत असताना दोन व्यक्तींमध्ये अचानक काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि दोघांमधील एकजनाने एकाची कॉलर पकडली आणि वाद आणखीनच चिघळा. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना कानशिलात लगावली आणि येथूनच फ्री स्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करायचा सोडून इतर लोक केवळ बघ्याची भूमिका बजावत होते. तर काहीजण व्हिडीओ काढण्यात मग्न होते. वादाच कारण अजून समजू शकलं नाही.
Slap War 3
Life inside General 2nd Class Mumbai Local coach, Frayed Tempers leads to a unending Slap War…
Only thing pleasing…is the rhythmic track sound.
#IndianRailways#MumbaiLocal pic.twitter.com/SVhUiFEG1N
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 27, 2023
व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबईच्या लोकल मध्ये घडलेली ही घटना प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. मुंबई मॅटर ह्या ट्विटर हॅन्डल वर हा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओ मुंबई लोकांच्या सेकंड क्लास कॉम्पार्टमेंट मधील असून नेमका कोणत्या लाईनच आहे हे अद्याप समजले नाही. या
व्हिडीओला 45.4k एवढ्या व्हिवज आल्या असून 195 जणांनी त्यास लाईक केले आहे.
Slap War.
The Lady’s intervention & the timely Motorman’s Horn seems to have finally ended the fight.
Life inside #MumbaiLocal Ladies Coach.#Lifeline of Mumbai pic.twitter.com/g9VOuFPwc3
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 24, 2023
2 महिलांमध्येही झाली होती मारामारी
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यातील दोन महिलांच्या मारामारीचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामध्ये देखील अशीच फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. लोकल मधून प्रवास करत असताना अचानक दोन महिलांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. एकमेकींचे केस ओढत तामसिक वृत्तीने हा वाद वाढला होता. मात्र बाजूच्या महिलांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि वाद काही प्रमाणात कमी झाला. हा व्हिडीओ देखील मुंबई मॅटर ह्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करण्यात आला आहे. ह्या व्हिडीओला 730 लाईक तर 357k जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून हा व्हिडीओ 24 सप्टेंबर रोजी ट्विट केला होता.