क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! Free मध्ये पाहता येणार World Cup आणि Asia Cup चे सामने

0
81
free world cup matches on disney hotstar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आगामी आशिया चषक (Asia Cup)आणि आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 (World Cup 2023) चे सामने क्रिकेट चाहत्यांना अगदी फ्री मध्ये पाहता येणार आहेत. ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारने (Disney Hotstar) याबाबत घोषणा केली असून त्यामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

क्रिकेट चाहत्यांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आशिया चषक आणि ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक या 2 स्पर्धांसाठी आपल्या मोबाइल वापरकर्त्यांसाठी पेवॉल उचलण्याचा निर्णय डिस्ने प्लस हॉटस्टारने घेतला आहे. त्यामुळे, भारतातील 540 दशलक्षाहून अधिक मोबाईल वापरकर्त्यांना लाईव्ह सामना पाहण्याची संधी मिळेल असं कंपनीचे मत आहे. यापूर्वी Jio Cinema ने आपल्या यूजर्सना IPL सामने अगदी फ्री मध्ये पाहण्याची सुविधा दिली होती.

कधी आहे विश्वचषक स्पर्धा आणि आशिया कप –

ODI विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होऊ शकतो. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होतील. हा वर्ल्ड कप भारतात होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना थेट मैदानात जाऊन सामना बघण्याची संधीही उपलब्ध आहे. 2011 नंतर प्रथमच 50 षटकांचा विश्वचषक सामना भारतात होणार असून भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी असेल. तर दुसरीकडे आशिया चषक 2023 च्या आयोजनाच्या तारखांबाबत अजूनही संभ्रम आहे.