टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल (freestyle fighting) तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर घडली आहे. टोमॅटो विक्रीवरून झालेल्या किरकोळ वादाचे मारामारीत (freestyle fighting) रुपांतर झाले. या मारहाणीप्रकरणी दोघा विक्रेत्यांनी परस्पर विरोधात कोळसेवाडी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या हाणामारीचा (freestyle fighting) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उमेश सोनकर, कैलास सोनकर, अविनाश गुप्ता असे गुन्हा दाखल झालेल्या भाजी विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

मारहाणीत तिघेही गंभीर जखमी
अविनाश गुप्ता आणि उमेश सोनकर दोघेही विठ्ठलवाडी पूर्वेकडील रेल्वे स्टेशन समोरील मुख्य रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अविनाश हा टोमॅटो विक्री करत होता. त्यावेळी उमेश सोनकर याने अविनाशला ‘तू टोमॅटो विक्री करून नको’ तू केवळ भाजी विक्री कर, असे सांगून वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर या वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत (freestyle fighting) झाले. त्यावेळी उमेशचा भाऊ कैलासही या दोघांच्या भांडणात पडला. त्यानंतर तिघांमध्ये फ्री स्टाईल तुफान हाणामारी झाली. या हाणामारी (freestyle fighting) वेळी दोन्ही गटांकडून लोखंडी वजन काटा एकमेकांच्या डोक्यात मारण्यात आला. या हाणामारीत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.

20 मिनिटे सुरु होती फ्री स्टाईल मारामारी
कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच हि फ्री स्टाईल हाणामारी (freestyle fighting) सुरु होती. या हाणामारीत तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अविनाश व कैलास या दोघांनीही पसरस्पर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे पण वाचा :
मंत्रिपद काढा की आता, पाठिंबा काढला आहे न्हवं; शंभुराज देसाईंच्या पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंटचा पाऊस

जितेंद्र आव्हाडांच स्वप्न होणार साकार; ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची दमदार घोषणा

च्यायला ! मी कधी जातीयवादी पोस्ट केली..?; नेटकऱ्याच्या मॅसेजवर किरण माने वैतागले

ऊसाची उंची जाडी वाढावी यासाठी काय करावे?

उदय सामंत गुवाहाटीला रवाना; शिवसेनेला मोठा धक्का

Leave a Comment