सरकारचा मोठा निर्णय- चीनसह ‘या’ देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीवर घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी केंद्र सरकारने कलर टेलिव्हिजनच्या (Color Television) आयातीवर बंदी घातली. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि आवश्यक नसलेली वस्तूंची आयात कमी करणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आता कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांचे आयात धोरण मुक्त श्रेणीतुन काढून प्रतिबंधित श्रेणीत आणले गेले आहे. “

या देशांमधून कलर टेलिव्हिजन भारतात आयात केले जातात
प्रतिबंधित प्रकारात एखादी वस्तू ठेवण्याचा अर्थ असा आहे की, जो व्यापारी त्या वस्तूची आयात करतो त्याला वाणिज्य मंत्रालयांतर्गत DGFT कडून आयात परवाना घ्यावा लागेल. चीन हा भारतात सर्वाधिक कलर टीव्ही निर्यात करणारा देश आहे. त्यानंतर अनुक्रमे व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलंड आणि जर्मनी या देशांचा क्रमांक लागतो.

केंद्र सरकारने टीव्ही सेटवर ही बंदी 36 सेमी ते 105 सेमी पर्यंतच्या स्क्रीन आकारांवर लादली आहे. हा निर्बंध 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टीव्ही सेटवर देखील लागू होईल.

गेल्या वर्षी चीनकडून सर्वाधिक आयात
सन 2019-20 मध्ये एकूण 781 मिलियन डॉलर्स किंमतीचे टीव्ही सेट्स भारतात आयात केले गेले. यात सर्वाधिक हिस्सा हा व्हिएतनाम आणि चीनचा होता. गेल्या आर्थिक वर्षात भारताने चीनकडून 428 मिलियन डॉलर्स किंमतीचे टीव्ही आयात केले. त्याच वेळी व्हिएतनामची आकडेवारी 293 मिलियन डॉलर्स होती.

यासंदर्भात पॅनासॉनिक इंडियाचे (Panasonic India) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष मनीष शर्मा म्हणाले की, आता ग्राहकांना उच्च प्रतीचे एसेम्बल्ड टीव्ही सेट्स मिळतील. ते म्हणाले, ‘देशांतर्गत असेंब्लीवर याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. काही आघाडीच्या ब्रँड्सने आधीच भारतात त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स उघडले आहेत. त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही. ते पुढे म्हणाले की, सरकारच्या या कारवाईचा प्रक्रियात्मक परिणाम होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment