‘नाथाभाऊंसोबतच्या ‘त्या’ भेटीबद्दल अजितदादांचा खुलासा, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे  । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं खडसे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

आज अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. भाजपचे नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे, तुमचीही आधी भेट झाली होती, असा सवाल विचारला असता अजित पवारांनी आपल्या स्टाइलने उत्तर दिले.

‘राजकीय जीवनात वावरत असताना अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात. अनेक जण कामानिमित्ताने भेटत असतात. त्याच दरम्यान, त्यांची आणि माझी भेट झाली होती. आता आमची भेट झाली म्हणून त्यातून कोणताही अर्थ काढू नये. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत की, याबद्दल माझ्याकडे माहिती नाही’, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

खडसे भाजप सोडून जाणार नाही- पंकजा मुंडे
दरम्यान, एकनाथ खडसे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत, याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, असं पंकजा यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment