दोस्तीत कुस्ती ! आधी मित्राला दारू पाजली अन् नंतर तलवारीने वार करत मित्राची केली हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी मिळून तलवारीने वार करून आपल्या मित्राची हत्या केली आहे. खून केल्यानंतर या आरोपींनी मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला होता. या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. महेंद्र उर्फ टिंकू दहीवले असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर शुभम नंदूरकर, निशांत कटकवार, दीपांशु शहारे व हेमंत पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत महेंद्र दहीवले हा बेला येथील शुभाष वॉर्डमध्ये राहत होता. तो 10 मार्चपासून घरातून बेपत्ता झाला होता. यानंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी 14 मार्च रोजी भंडारा पोलिसांत आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आपला तपास सुरु केला. यावेळी पोलिसांना मृत व्यक्तीने 9 मार्च रोजी आपल्या मित्रासोबात पार्टी केल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या पार्टीत उपस्थित लोकांची फेरतपासणी केल्यावर आरोपी शुभम आणि मृतकाचे पार्टी दरम्यान जोरदार भांडण झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

काय घडले नेमके ?
या भांडणादरम्यान मृत महेंद्रने आरोपी शुभमला मारहाण केली होती. यानंतर आरोपीने दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रासोबत मृत व्यक्तीच्या घरी जाऊन जोरदार भांडण केले. यानंतर आरोपी शुभमने मृत महेंद्रची माफी मागत त्याला समजावले आणि त्याला आपल्यासोबत पार्टीला घेऊन गेला. यादरम्यान कारधा नदीच्या पुलावर दारू पार्टी झाल्यावर आरोपी शुभम याने महेंद्र याला पुन्हा मारहाण करत त्याच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये महेंद्र गंभीर जखमी होऊन पळू लागला. यानंतर या आरोपींनी त्याला पकडून नदीत फेकून दिले. मृतदेह बाहेर येऊ नये म्हणून बांबूच्या बासाने त्याला पाण्यामध्ये बुडवत होते. यानंतर पोलिसांनी आरोपींच्या कबुली जबाबानंतर त्यांना अटक केली. भंडारा पोलिसांनी या आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.