व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

परप्रांतीय आत्महत्याग्रस्त कामगाराचे आयुष संस्थेकडून अंत्यसंस्कार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कुपवाड शहरातील औद्योगिक वसाहती लगत असणाऱ्या शरद नगर येथे एका परप्रांतीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. गौतम रामशंकर जाटव असे मयत परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. आयुष हेल्पलाईन टीम च्या रुग्णवाहिकेतून सदर मयत कामगारास उत्तरीय तपासणीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

आयुष सदस्यांनी या परप्रांतीय कामगाराची माहिती घेतली असता मयत परप्रांतीय कामगार हा पत्नी सोबत राहत होता. त्यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती दिली असता त्यांनी सांगितले आमची आर्थिक परिस्थिती नसल्याने यांचे पुढील कार्य आम्ही करू शकत नाही. सदर मृत व्यक्तिची पत्नी एकटीच असल्याने ती अंतविधि करू शकत नव्हती.

तिने आयुष हेल्पलाईन टीमकडे मदत मागितली त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता आयुष हेल्पलाईन टीमच्या सदस्यानी त्या मृत व्यक्तिवर अंतिम संस्कार केले व सामाजिक दायित्व पार पाडले. यावेळी आयुष हेल्पलाईन टीमप्रमुख अविनाश पवार ,सुरज शेख, यश मोहिते ,चिंतामणी पवार, आजर शेख आणि चांद शेख हे मदतीसाठी उपस्थित होते.