“आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन यायचो, रोज नाही”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राजभवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दरबार हॉलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर साधला. “विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. रोज येत नव्हतो,”असा टोला ठाकरे यांनी लगावला.

मुंबईत पार पडलेल्या दरबार हॉलच्या उद्धघाटन कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपले राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. 50 एकरात हे राजभवन आहे. या ठिकाणची असलेली हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या, असा टोला यावेळी ठाकरेंनी लगावला.

पावसाळ्यात मोर नाचतानाचे फोटो येतात, तर, कधी विषारी साप पकडल्याचे फोटो येतात. शिवसेना प्रमुखांसोबत येथे यायचो, राज्यपाल यांना भेटायला यायचो. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना भेटायला बोलावलेले त्यावेळी आलेलो होतो. आता जुना वारसा जपून आपण आधुनिककतेकडे चाललो आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकले जाते. मात्र, या ठिकाणी जपलेले आहे,असे ठाकरे यांनी म्हंटले.

Leave a Comment