हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उद्या म्हणजेच ९ आणि १० सप्टेंबरला देशाची राजधानी दिल्ली येथे G-20 परिषदेची बैठक पार पडणार आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर या समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जगभरातील अनेक देशाचे राष्ट्रपती भारतात दाखल झाले आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेसाठी खास अँप लाँच केलं आहे. G20 इंडिया असे या अँपचे नाव असून या माध्यमातून G-20 परिषदेबाबत संपूर्ण माहिती देशातील नागरिकांना समजू शकेल तसेच भारत आपली डिजिटल क्षेत्रातली प्रगती सुद्धा जगाला दाखवेल. हे ऍप काय आहे आणि ते कस काम करत हे आपण जाणून घेऊ.
काय आहे हे App?
प्रतिनिधी आणि उपस्थितांसाठी आणखी एक उपयुक्त साधन G20 इंडिया मोबाइल ऍप असेल, जे शिखर परिषदेबद्दल अद्ययावत माहिती प्रदान करेल. त्याच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये G20 इंडियाचे इव्हेंट कॅलेंडर, व्हर्च्युअल टूर, नेव्हिगेशन यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत विविध ऍप तयार केली आहेत. ज्यात सर्व प्रकारची माहिती हीं सामान्य लोकांपर्यंत पोचते . भारताने UIDAI, UPI, UMANG, COWIN सारख्या डिजिटल माध्यम विकसित करून डिजिटल क्षेत्रात आपली छाप टाकली आहे. हा सर्व विकास देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचा ठरत आहे. ह्याचीच जगाला ओळख करून देण्यासाठी भारताने G-20 मध्ये G-20 इंडिया सारखे अँप विकसित केले आहे.
काय आहेत वैशिष्ट्य?
G20 इंडिया अँपद्वारे G20 प्रतिनिधी कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी प्राप्त करण्यास सक्षम असतील. हे अँप 5 UN भाषा आणि 5 इतर भाषा इंग्रजी, हिंदी, जर्मन, जपानी आणि पोर्तुगीज अश्या एकूण 24 भाषामध्ये उपलब्ध असेल.
ऍपमध्ये असेल नेव्हीगेशन
G-20 इंडिया’ अॅपमध्ये नेव्हिगेशन सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे परदेशी प्रतिनिधींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि भारत मंडपमपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.