हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदाचा दिवाळीत पुणेकरांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठी गिफ्ट देण्यात आली आहे. गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. गुरुवारी सुमारे 35 कोटींचा दोन प्रकल्पांना गडकरींकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती स्वतः माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या विकासात आणखीन भर पडणार आहे. मुख्य म्हणजे, मंजुरी मिळालेल्या दोन प्रकल्पांपैकी एक प्रकल्प पुणे शहराशी संबंधित आहे. तर दुसरा प्रकल्प पुणे- छत्रपती संभाजीनगरशी संबंधित आहे.
दोन प्रकल्प कोणते असतील?
नितिन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या विकासासाठी या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे यातील पहिला प्रकल्प हा शहरातील रस्ता, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेशी जोडलेला आहे. या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या प्रकल्पात पुणे- छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडण्यासाठी रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता चाकण, तळेगावमार्गे तयार करण्यात येईल. ज्यामुळे पुणेकरांना काही वेळातच संभाजीनगरला जात येईल.
दरम्यान नितीन गडकरी यांनी या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी दिल्यामुळे पुणे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. सध्या पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी वर तोडगा काढण्यासाठी स्कायबसचा प्रकल्प देखील मंजूर करण्यात आला आहे. स्काय बस, मेट्रो अशा प्रकल्पांमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच प्रदूषणावर आळा बसेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी हे प्रकल्पात त्यांना महत्त्वाचे ठरणार आहेत.