हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: कोरोना परिस्थितीचा आढावा उपाययोजना करता येतील यासाठी भाजप महानगर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीस यांना देखील खडे बोल सुनावले. आपण सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड लावले पाहिजे झेंडे लावले पाहिजे याची गरज नाही. यात राजकारण करू नका असा कडक सल्ला गडकरी यांनी दिला आहे.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, कोरोनाच्या बाबतीत राजकारण करू नये. सगळ्याच गोष्टींमध्ये बोर्ड लावले पाहिजे झेंडे लावले पाहिजे याची गरज नाही लोकांना माहिती आहे या वेळी लोकांना आपण राजकारण केलं तर ते लोकांना आवडणार नाही तुम्ही जे काही चांगलं काम केलं ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे त्याचे क्रेडिट आपोआपच तुम्हाला आणि पक्षाला मिळणार आहे. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले.
आपली प्रतिमा वाईट होइल असे वागू नका
याबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले ‘मी फोटो पाहिलेत की एका ठिकाणी एकच ऑक्सीजन सिलेंडर देत असताना चार जण फोटो काढून ते शेअर करताहेत असं काही करु नका आपल्याबद्दल जी प्रतिमा वाईट होईल असे गडकरी यांनी कार्यकर्त्यांना बजावले. पुढे बोलताना ते म्हणाले नुसता निवडणुका लढवून आणि सत्तेत जाणे एवढच राजकारणाचा भाग नाही. प्लीज राजकारण हे सत्ताकारण नाहीये, समाजकारण, राजकारण आणि विकास कारण म्हणजे राजकारण आहे असं ते म्हणाले.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले समाजाच्या मागे एक गरीब माणसाच्या मागे उभे राहत जात, पात, धर्म, पंथ, पार्टी, पक्ष हे सर्व विसरून सर्वांच्या सोबत योग्य प्रकारे मदत करण्यात त्यांच्या मागे उभा राहून काम करावे लागणार आहेत हेच आपल्या भविष्यात नेतृत्वाला आणि पक्षाला याचे नक्कीच फळ मिळणार आहे हे मागून मिळणार नाही हे काम करून आपोआपच त्याचे फळ मिळणार आहे असे गडकरी म्हणाले