पुणे प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या झंझावातासमोर काँग्रेसची पूर्ती गाळण झाली. तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून आज पर्यंत तब्बल दोन महिने काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडता आला नाही.
काँग्रेसचा अध्यक्ष तरुण आणि उच्चशिक्षित असावा असा राहुल गांधी यांचा व्होरा आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यासाठी सर्व निकषात बसणार पुणे येथे कंपनीत काम करणारा एक तरुण इच्छुक आहे. त्याचे नाव गजानंद होसाळे असे आहे. त्याचे अभियांत्रिकीत पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून तो सध्या पुण्यात एका कंपनीत काम करतो. गजानंद हा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा या तालुक्यातील असून त्याचे वडील शेती करतात.
घरातून कसलीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने गजानंदला राजकारणात यायचे आहे. कार्यकर्ता किंवा नेता होण्यापेक्षा थेट राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यास पक्षातून त्याला विरोध होणार नाही असे त्याचे मत आहे. गरिबी हटाओच्या मुद्द्यावर प्रत्यक्ष काम करणे आणि शेकऱ्याच्या प्रश्नावर काम करणे हे गजानंदचे राजकारणात येण्याचे मूळ उद्दिष्ट आहे. गजानंद उद्या पर्यंत काँग्रेसच्या पुण्यातील मुख्यालयात आपला अध्यक्ष पदासाठीचा अर्ज दाखल करणार आहे.