गणेश नाईकांचा भाजपला धक्का ; त्यांच्या ‘या’ कृतीने भाजप हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि नवी मुंबईमध्ये आपला गट उभा करून गड बांधणारे गणेश नाईक भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी केलेल्या कृतीने भाजप अवाक झाले आहे. कारण नवी मुंबईत त्यांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबतच विरोध घेतला असल्याचे दिसून येते आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत गणेश नाईक यांनी भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवत आपले पॅनल सत्तेवर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या या कृतीने भाजप हैराण झाले आहे.

गणेश नाईक यांना मानणारा वर्ग नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या भागात पसरलेला आहे. अनेक नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांना घेऊन गणेश नाईक हे भाजप मध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यांचा मुलगा भाजपमध्ये गेला. मात्र ते गेले नाहीत अशा स्थितीत ते छोट्या मोठ्या नेत्यांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

दरम्यान गणेश नाईक यांच्या डॉ. राणे पॅनलने भाजपच्या नमो पॅनलचा धुव्वा उडवत नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनची निवडणूक जिंकली. गणेश नाईक यांच्या पॅनलला ११ तर नमो पॅनलला १ जागी विजय मिळाला आहे. गणेश नाईक यांच्या पॅनलचे निर्विवाद बहुमत या संस्थेवर आले आहे. अशात जुने भाजपचे कार्यकर्ते आणि गणेश नाईक यांचे नव्या मुंबईमध्ये हाडवैर आहे. हे राजकीय वैर संपवण्याचे भाजप नेतृत्वापुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे भाजप यातून काय तोडगा काढते ते बघण्यासारखे राहणार आहे.