मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याचा कार्यक्रम भाजपकडून सध्या पध्द्तशीर राभवला जात आहे. अशातच नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या मुलाने याआधीच भाजपमध्ये प्रेवेश केला आहे. गणेश नाईक हे येत्या ९ सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
ठाणे , कल्याण , मीरा भाईंदर भागात गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक नगरसेवक त्यांचा शब्द अंतिम मानून काम करतात. त्या सर्वांची मोट बांधून गणेश नाईक हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा माध्यमात होत्या. त्यासाठीच ते मागे देखील थांबले होते. त्यामुळे त्यांनी मोठा राजकीय समूह घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबई म्हनगरपालिकेचे सर्व नगरसेवक देखील त्यांच्या सोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
गणेश नाईक यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना मंत्री देखील बनवले त्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक भाजपमध्ये गेल्यास त्याचा मुंबई उपनगरावर मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.