वसईत चड्डी बनियान गॅग पुन्हा सक्रिय

0
173
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी| वसई-विरार परिसरात चड्डी-बनीयन गॅग पुन्हा सक्रीय झाल्याची घटना उघडकीस आली आहे.सोसायटीत रात्रीच्या वेळी हातात कोयते -सुरे घेऊन आलेले चोरटे चड्डी-बनीयन गॅगचे असल्याचे सिसिटीव्ही फुटेजवरून लक्षात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वसई पश्चिम येथील ओमनगर परिसरातील निर्मला अपार्टमेंटमध्ये ४  सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास  हे चोर आले होते.अंगाला तेल लावून व चड्डी -बनीयन घातलेल्या या चोरांच्या हातात प्राणघातक शस्त्रे असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अपार्टमेंटमध्ये हे चोर रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान आले होते.त्यांनी सर्वप्रथम सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅटच्या दरवाज्याला बाहेरून कड्या लावल्या होत्या.त्यानंतर पहिल्या माळ्यावरील एका फ्लॅटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना आवाज झाल्याने फ्लॅटमधील अभ्यास करत बसलेली मुलगी बाहेर आली.मात्र याची कुणकुण लागताच चोरांनी तेथून काढता पाय घेतला.

सदर घटना सोसायटीमध्ये  लावलेल्या सिसिटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. माणीकपूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिस सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे चड्डी-बनीयन गॅगचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here