नात्याला काळिमा! पतीकडून आपल्या 2 मुलांसह पत्नीवर सामूहिक बलात्कार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नुकतीच मुंबईत (Mumbai) नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या 2 मुलांसोबत मिळून 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Rape Case) केला आहे. मुख्य म्हणजे, पिडीत महिला आरोपी व्यक्तीची दुसरी पत्नी तर या दोन मुलांची सावत्र आई आहे. तिच्यावरच या नराधमांनी लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी या तिन्ही आरोपींवर ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला दारू पाजून गुंगीचे औषध देऊन तब्बल तीन महिने लैंगिक अत्याचार केले. पुढे एवढेच करून न थांबता त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडिओ शूट करून ते पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले आहेत. याची माहिती पिडीत महिलेला मिळताच तिने आपल्या भावासोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना आरोपींच्या फोन मध्ये तब्बल 700 पेक्षा जास्त पॉर्न व्हिडिओ सापडले आहेत. ज्यामध्ये दोन व्हिडिओ पिडीत महिलेचे आहेत. सध्या पोलीस या सर्व घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तर तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण नेमक काय?

पीडित महिलेचा 2010 साली आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट झाला होता. यानंतर 2015 मध्ये तिची आरोपीची ओळख झाली आणि त्या दोघांनी लग्न केले. हे दोघेजण ट्रॉम्बे येथील चीता कॅम्प परिसरात राहत होते. पिडीत महिलेला आठ आणि दहा वर्षांचे दोन मुले देखील आहेत. आरोपीचा कोरोना काळात आपल्या पहिल्या पत्नीशी घरगुती हिंसाचारामुळे घटस्फोट झाला होता. त्यामुळे तो आपल्या 20 आणि 22 वर्षांच्या दोन मुलांना घेऊन पिडीत महिलेसोबत राहत होता.

सर्वात पहिल्यांदा जून महिन्यात आरोपीने पीडित महिलेला गुंगीचे औषध पाजले होते. इतकेच नव्हे तर हेच औषध त्याने आपल्या मुलांना देखील पाजले. यानंतर या दोन्ही मुलांना महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी भाग पाडले. हे सर्व घडत असताना त्याने त्याचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केले. हा सर्व प्रकार सलग तब्बल तीन महिन्यांच्या पुढे चालला. परंतु शुक्रवारी पहाटे महिलेने आरोपीचा फोन तपासल्यानंतर त्यामध्ये तिला स्वतःचे अश्लिल व्हिडिओ आढळून आले. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. या महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना कोळीवाडा परिसरातून अटक केली आहे.