नवी दिल्ली | गॅस अनुदान सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट. हे अनुदान सरकारच्या डायरेक्ट अकाऊंट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा होत असते. आता बरेच लोक सरकारदारे गॅस अनुदानाचा लाभ घेत आहे. अशा परिस्थितीमुळे आपल्या गॅसची सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये वेळच्या वेळी जमा होते की नाही. हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यासाठी एक सोपा मार्ग आहे. त्यामार्फत आपण सहज याबाबत माहिती मिळवू शकता.
गॅस अनुदान जमा झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण www.mylpg.in या वेबसाईटवर जाऊन, नवीन पेज वर उजवीकडे गॅस कंपनीचे चित्र आणि सेवा प्रदाता त्याचे गॅस सिलेंडर निवडा. त्यानंतर नवीन विंडोमध्ये साइन इन आणि न्यू रजिस्टरचा पर्याय उपलब्ध आहे. तेथे साइन इन करा. अन्यथा नवीन नोंद करून आयडी तयार करून लॉगिन करा. जर LPG ID माहिती नसेल तर, ‘Click here to know your LPG ID’ वर क्लिक करा. आपला रजिस्टर मोबाईल नंबर, एलपीजी ग्राहक आयडी, राज्य वितरक माहिती इत्यादी भरणे गरजेचे आहे. यानंतर कॅपच्या कोड टाकून प्रोसेस बटणावर क्लिक करा. नवीन पेजवर एलपीजी आयडी स्पष्टपणे दिसून येईल. तो एका कागदावर लिहून ठेवा. भविष्यात त्याचा उपयोग पडेल.
यानंतर आपल्याला आपल्या खात्याचा तपशील पाहायला मिळेल. येथे आपले बँक खाते हे आधार सहित एलपीजी खात्याशी लिंक केले आहे की नाही हे पाहायला मिळेल. या पेजच्या उजव्या बाजूला ‘सिलेंडर बुक हिस्ट्री’ अथवा ‘सबसिडी ट्रान्सफर’वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला अनुदानाची रक्कम समजेल. जर आपल्याला आपल्या खात्यात अनुदान मिळत नसेल तर आपण 1800 233 555 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. फिडबॅक पर्यायावर जाऊन याविषयी तक्रार दाखल करू शकता.