परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयास पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. औषधीच्या साठ्याबाबत माहिती घेऊन औषधे कमी पडणार नाही व शिवभोजन थाळीची संख्या वाढवण्याबाबतही संबंधितांना सूचना दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा यावेळी पालकमंत्र्यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत वाढत्या कोरोनाच्या उपाय योजनांवर आढावा घेण्यात आला.
दरम्यान देशभरात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, काल जनता कर्फ्यू घोषित केला होता. त्याला परभणी शहरासह, जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळला असून, जिल्हातील सर्वच तालूक्यातील लहान मोठ्या बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ शहरांसह गावखेड्यात ही रस्ते निर्मनुष्य झाले होते, रस्त्यावरून एखाद-दुसरा वाहन वगळता, वाहतूकही दिसून येत नव्हती. त्यामुळे प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला, १०० % प्रतिसाद मिळाल्याच चित्र संपूर्ण परभणी जिल्हात मध्ये दिसून आले.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.