हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात दारुण हार पत्करली. आश्चर्य म्हणजे या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय गोलंदाजीची पिसे काढताना तब्बल 370 पेक्षा जास्त धावा काढल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अनेक दिग्गजांनी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली. गंभीर म्हणाला,”विराट कोहलीचे निर्णय मला कळलेच नाही. स्ट्राँग बॅटिंग लाईन अप असलेल्या प्रतिस्पर्धी संघाला विकेट घेत धक्के देत राहणे गरजेचे आहे, हे आपण वारंवार बोलत आहोत. पण, तुम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजाकडून दोन षटकांची स्पेल करून घेता. वन डे क्रिकेटमध्ये साधारणता ४-३-३अशा तीन स्पेल टाकल्या जातात, परंतु प्रमुख गोलंदाजाला दोन षटकानंतर थांबवले जाते. अशी नेतृत्व समजण्यापलीकडे आहे. ही ट्वेंटी-20 क्रिकेट नाही.
”वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे किंवा अन्य कोणता तरी पर्याय ठेवायला हवा होता. पण, यापैकी एकही पर्याय न ठेवणे, ही निवड प्रक्रियेची चूक आहे. एखाद्या खेळाडूची कामगिरी तपासण्यासाठी त्याला संधी द्यायला हवी. भारतीय संघानं तसे करणे योग्य समजले नाही आणि त्याचा फटका संघाला बसत आहे,”असेही गंभीर म्हणाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’