टीम, HELLO महाराष्ट्र । सर्वसामान्यांना धक्का देणाऱ्या रिझर्व बँकेने मोदी सरकारलाही धक्के दिले आहेत. या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या रिझर्व बँकेन आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरच आर्थिक मंदीचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एकीकडे विकास दर कमी राहील असा अंदाज व्यक्त करणाऱ्या रिझर्व बँकेने दुसरीकडे मात्र महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या ३.५ टक्के असलेला महागाई दर ३.७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज रिझर्व बँकेकडून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक आघाडीवर संकटात सापडलेल्या केंद्र सरकारला आरबीआय रेपो रेट कमी करुन काहीसा दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळं मोदी सरकाराला मोठा धक्का बसला आहे.