हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर पुणे महामार्गावर अज्ञात दरोडेखोरांनी एका वाहन चालकाला मध्यरात्री अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने या दरोडेखोरांनी त्याचा चारचाकीतून पाठलाग करुन या वाहन चालकाच्या स्काॅर्पिओ गाडीवर फायरिंग करीत त्याला अडवले आणि मारहान करीत त्याच्या ताब्यातील तब्बल रोख रकगकमेसह ३ कोटी ६० लाख २६,०००/- रू किंमतीचा ऐवज लुबाडल्याचा धक्कादाक प्रकार इंदापूर तालुक्यात सोलापुर पुणे रोडवर घडली आहे.
यासंदर्भात भावेशकुमार अमृत पटेल, वय ४० वर्ष, व्यवसाय नोकरी रा. कहोडा, ता. उंझा, जि. मेहसाना, राज्य गुजरात सध्या रा. पंचरत्न बिल्डींग, मुंबई, यांनी शुक्रवारी दि.२६ आँगस्ट २०२२ रोजी इंदापूर पोलीसांत फिर्यादी दिली आहे.इंदापुर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात दरोडेखोरांविरुध्द भादवि कलम ३९५ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते,बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,उपविभागीय पोलीस अधीकारी दौंड सुरेशकुमार धस,स्था. गु.अ.शाखा पुणे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, दौंड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक घुगे, भिगवणचे सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा सखोल तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचे तपासकामी पाच पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
भावेशकुमार पटेल यांच्या फिर्यादीनुसार,दिनांक २६ आँगस्ट २०२२ रोजी ते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मौजे वरकुटे पाटी गावचे हद्दीत सोलापुर पुणे रोडवर स्पिड ब्रेकर जवळ आले. ते स्वतः स्कॉपीओ वाहन नंबर. टी. एस. ०९ ई.एम. ५४१७ ने प्रवास करीत होते आणि स्वत: वाहन चालवित होते.
दरम्यान चार अज्ञात चार अनोळखी चोरटे हातातील लोखंडी टॉमी दाखवुन फिर्यादी यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी पटेल हे गाडी तेथुन भरधाव वेगात सोलापुर पुणे रोडने पुणे बाजुकडे घेवुन निघाले.त्यानंतर मारूती सुझुकी कंपनीची फोर व्हिलर स्विप्ट गाडी व टाटा कंपनीच्या गाडीने पटेल यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला.
गाडी थांबवित नाही म्हणून पटेल यांच्या गाडीवर फायरिंग करून पटेल यांना रस्तामध्ये अडवुन चार चोरट्यांनी भावेशकुमार पटेल व विजयभाई यांना हाताने मारहाण केली तर दोन चोरटे गाडीमध्ये बसलेले होते. मारहाण करणाऱ्या त्या चार चोरट्यांनी पटेल यांच्या स्काॅर्पिओ गाडी मधील रोख रक्कम ३ कोटी ६०,००,०००/- रू रोख रक्कम व भावेशकुमार पटेल यांच्या जवळील रोख रक्कम १४,०००/ रूपये तसेच दोन व्हिओ कंपनीचे मोबाईल किंमत रुपये १२,०००/- रू किंमतीचा असा एकुण ३ कोटी ६० लाख २६,०००/- रू किंमतीचा ऐवज घेऊन ते फरार झाले.