हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ESAF Small Finance Bank ने गुंतवणूकदारांसाठी FD ची एक स्पेशल योजना आणली आहे.
या स्पेशल एफडी योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 999 दिवसांचा असेल. यामध्ये सर्वसामान्यांना 8 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. हा स्पेशल एफडी प्रोग्राम 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध असेल. Bank FD
या मर्यादित कालावधीच्या ऑफर व्यतिरिक्त, ESAF स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँक आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर सर्वसामान्यांना 4.00% ते 5.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 4.50% ते 5.75% पर्यंत व्याजदर देत आहे. Bank FD
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. Bank FD
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Bank FD
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.esafbank.com/interest-rates/
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा