Get Cash At Home | आता बँकेत न जाता घरबसल्याच काढता येणार पैसे; कसे ते जाणून घ्या

0
1
Get Cash At Home
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा आपल्याला इमर्जन्सी कॅश पैशाची गरज लागते. परंतु आपल्याला जर पैसे काढायचे असेल, तर आपल्याला एक तर बँकेमध्ये जावे लागते, किंवा एटीएममध्ये जावे लागते. परंतु जर आपल्याला बँकेत किंवा एटीएम मध्ये जायला वेळ नसेल, तर आपल्याला पैसे काढता येणार नाही. परंतु आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी बँकेची एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. कारण आता घरबसल्या (Get Cash At Home) हे पैसे एटीएमद्वारे तुम्हाला मिळणार आहे. ही नवीन योजना पोस्ट ऑफिसने सुरु केलेली आहे.

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेले आहे की, “जर तुम्हाला पैशाची तात्काळ गरज भासली आणि तुमच्याकडे बँकेत जाण्यासाठी वेळ नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आम्ही आधार एटीएम एईपीएस या सेवेचा वापर करून तुम्ही घरबसल्या पैसे काढता काढू शकता. पोस्ट मास्टर आता तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे (Get Cash At Home) काढण्यास मदत करेल.

ही सेवा कसे कार्य करणार | Get Cash At Home

आधार आधारित या पेमेंट बँक प्रक्रियेद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या बायोमेट्रिक्सचा वापर करून रोख रक्कम काढू शकते. किंवा आधार लिंक केलेल्या खात्यातून पेमेंट करू शकते. एटीएम किंवा बँकेला भेट न देता एईपीएस वापरून ग्राहक छोटी रक्कम काढू शकतात. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. यासाठी तुमचे आधार तुमच्या बँक खात्यात लिंक करणे गरजेचे आहे.

Aeps प्रणालीद्वारे तुम्ही घरबसल्या पैसे काढू शकता. तुमच्या खात्यात किती पैसे आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. तुम्ही या सेवेतून मिनी स्टेटमेंट देखील काढू शकता. याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकता. या सेवांसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही परंतु तुम्हाला घरोघरी सेवा देण्यासाठी शुल्क भरावे लागेल. आधार ATM वापरण्यासाठी, तुमच्याकडे आधारशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरण देखील आवश्यक आहे.