हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : बँकांमध्ये FD करणे ही जोखीममुक्त गुंतवणूक मानली जाते. तसेच यामध्ये पैसे बुडण्याचा कोणताही धोका नसल्यामुळे आणि चांगला रिटर्न देखील मिळत असल्यामुळे अनेक लोकं आपले पैसे FD मध्येच गुंतवतात. अशातच आता RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. जर आपल्यालाही FD करायची असेल तर आपल्याकडे वेगवेगळ्या बँकांच्या FD वरील व्याजदरांबाबतची माहिती असणे आवश्यक आहे. मात्र इथे ध्यानात घ्या कि, मोठ्या बँकांपेक्षा स्मॉल फायनान्सिंग बँका फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याज देत आहेत. चला तर मग आज आपण सध्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांबाबतची माहिती जाणून घेउयात…
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 8.00 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.7 टक्के व्याज देत आहे. FD Rates
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक देखील एफडीवर जास्त व्याज देत आहे. ही बँक 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 8.00 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याज देत आहे. FD Rates
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळत आहे. या बँकेकडून 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 9.00 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्के व्याज दिले जात आहे. FD Rates
जन स्मॉल फायनान्स बँकेकडून 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 8.10 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.80 टक्के व्याज मिळत आहे. FD Rates
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या 1001 दिवसांच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना 8.51 टक्के दराने तर ज्येष्ठ नागरिकांना 8.76 टक्के दराने व्याज मिळेल.
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून 1001 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 8.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.75% व्याज दिले जात आहे. FD Rates
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nesfb.com/Interest_Rates
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ