हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : दररोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला अनेक लोकं व्यवसायाद्वारे लाखो रुपये कमावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. जर आपल्यालाही एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण एका अशा व्यवसायाबातची माहिती जाणून घेणार आहोत. ज्याद्वारे कमी गुंतवणुकीत जास्त पैसे कमवता येतील. चला तर मग कमी गुंतवणुकीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या या जबरदस्त व्यवसायाबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात…
सध्याच्या काळात अंड्यांचा खप वाढला आहे. अशा परिस्थितीत अंडी ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे टाकाऊ कागद आणि पुठ्ठ्यापासून अंड्याचे ट्रे बनवण्याच्या व्यवसायामध्ये तेजी आली आहे. या व्यवसायाद्वारे कमी खर्चात भरपूर नफा मिळेल. जर आपल्यालाही कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा हवा असेल तर हा व्यवसाय सुरू करता येईल. New Business Idea
कोण-कोणत्या गोष्टी लागतील ???
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी टाकाऊ कागद, पुठ्ठा, कागदाच्या नळ्या आणि कॉस्टिक सोडा यांसारख्या कच्चा माल लागेल. जो बाजारात अगदी सहजरित्या उपलब्ध देखील आहे. त्याचप्रमाणे ट्रे बनवण्यासाठी पेपर कटिंग मशीन, पेपर पल्पिंग मशीन, फॉर्मिंग मशीन आणि ड्रायिंग मशीनची देखील गरज भासेल. New Business Idea
अशा प्रकारे सुरु करा
कागदी अंड्याचे ट्रे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी टाकाऊ पुठ्ठा आणि कागद पूर्णपणे स्वच्छ केले जातात. यानंतर यामधील धूळ कुस्करून काढून टाकली जाते. यानंतर ते व्यवस्थित कापून त्याचे छोटे तुकडे केले जातात. यंत्राच्या साहाय्याने टाकाऊ कागदाचे तुकडे हायड्रॉलिकमध्ये टाकले जातात आणि नंतर ते पाण्यामध्ये मिसळून त्याला घनरूप दिले जाते. यानंतर त्यामध्ये कॉस्टिक सोडा टाकला जातो आणि काही काळ सोडल्यानंतर तो पंपाने टाकीत ठेवला जातो.
आता यंत्राच्या साहाय्याने हे पेपर मटेरियलला अंड्याच्या ट्रेसारखा आकार दिला जातो. तसेच सुकल्यानंतर ते पॅक केले जाते. हे जाणून घ्या कि, अंड्याची दुकाने आणि बाजारपेठेमध्ये यासाठी मोठी मागणी देखील आहे. अंडी व्यवस्थित ठेवण्यासाठी ट्रे खूप महत्वाचा आहे. तसेच जर या व्यवसायामध्ये जास्त मनुष्यबळाचा वापर करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येईल. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार आधीपेक्षा जास्त व्याज, असे असतील नवीन दर
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 60,000% रिटर्न
Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये