हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या पॉलिसी चालवल्या जातात. ज्यामध्ये पैसे गुंतवून मजबूत नफा मिळवता येतो. आज आपण एलआयसीच्या एका अशा पॉलिसीबाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण 91 लाख रुपये मिळतील. LIC च्या या पॉलिसीचे नाव LIC धन वर्षा योजना असे आहे. यामध्ये आपल्याला अनेक फायदे दिले जात आहेत. यामध्ये लहानपणापासूनच गुंतवणूक सुरू करता येते. तसेच यामध्ये जास्त पैसे देखील गुंतवावे लागत नाहीत. या योजनेमध्ये मोठा फायदा मिळू शकतो.
एलआयसीच्या या योजनेमध्ये 10 पट नफा मिळू मिळू शकेल. यासोबतच लाईफ इन्शुरन्सचा लाभही मिळू शकेल. यासाठी फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल. एलआयसीची धन वर्षा योजना ही एक नॉन-पार्टिसिपेटेड, पर्सनल, बचत, लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. याद्वारे ग्राहकांना कव्हर आणि बचत दोन्हीचे फायदे मिळतात.
ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी करता येणार नाही, ती फक्त ऑफलाइनच खरेदी करता येते. या पॉलिसीसाठी एलआयसीच्या कार्यालयात जाऊन तेथे अर्ज करावा लागेल. यामध्ये, फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल, जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर निधीची रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते.
जर 15 वर्षांपर्यंत योजना सुरु करायची असेल तर त्यासाठीचे किमान वय 3 वर्षे आणि 10 वर्षांसाठी किमान वय 8 वर्षे आहे. यामध्ये फक्त 35 वर्षांचे झाल्यावर, 10% सहीत 15 वर्षांची पॉलिसी मिळू शकते. या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला 91,49,500 रुपये मिळतील. ही योजना पूर्ण झाल्यावर गॅरेंटेड रक्कम देखील देते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Dhan-Varsha-(Plan-No-866,-UIN-No-512N349V01)
हे पण वाचा :
Bank FD : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेच्या FD वर मिळत आहे 7.40% पर्यंत व्याज !!!
BSNL च्या 184 रुपयांच्या प्लॅनमध्ये 395 दिवसांसाठी मिळवा ‘हे’ फायदे
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा
Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये
Post Office Tax Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजनांमधील गुंतवणूकीद्वारे वाचवता येईल टॅक्स