हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून EPFO खातेधारकांच्या हितासाठी नेहमीच विविध योजनांच्या माध्यमातून पावले उचलली जातात. आताही कामगार मंत्रालयाने ईपीएफओ खातेधारकांसाठी EPS-95 नावाची योजना सुरु केली आहे. ज्या अंतर्गत खातेदारांना कमीत कमी मासिक पेन्शन दिली जाते.
ईपीएफओने ट्विट करत EPS 95 शी संबंधित फायदे आणि वैशिष्ट्यांविषयीची माहिती दिली आहे. सध्या देशभरात EPFO चे 6 कोटींहून जास्त सदस्य आणि 75 लाख पेन्शनधारक आहेत, ज्यांना आता त्याचा लाभ मिळणार आहे. चला तर मग EPS 95 योजनेबाबत तपशीलवार माहिती जाणून घेउयात…
EPS’95 benefits are available to both existing and new #epf members… #AmritMahotsav #pension #EPS pic.twitter.com/201KAecq4x
— EPFO (@socialepfo) December 22, 2022
EPS 95 चे फायदे जाणून घ्या
EPS-95 योजनेमध्ये कोणताही ईपीएफओ खातेदार तसेच त्यांचे विधवा पुरुष अथवा महिला आणि मुलांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत, जर एखाद्या खातेदाराचा त्याच्या नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर त्याच्या जोडीदाराला कमीत कमी 1000 रुपयांची मासिक पेन्शन दिली जाते.
या योजनेमध्ये सदस्याला वयाच्या 58 व्या वर्षी रिटायरमेंटनंतर पेन्शन दिली जाते.
तसेच या योजनेमध्ये 50 वर्षे वयापासून प्रारंभिक सदस्य पेन्शन (बेरोजगार असल्यास) मिळेल.
यामध्ये सेवेच्या कालावधीत सदस्य कायमस्वरूपी आणि पूर्णपणे अपंग झाल्यास अपंगत्व पेन्शनची तरतूद देखील आहे.
या योजनेमध्ये खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराला मिळणाऱ्या पेन्शनच्या 25 टक्के रक्कम त्याच्या दोन्ही मुलांना मिळते.
दोन्ही मुलांना 25 वर्षे वयापर्यंत समान रक्कम 25-25 टक्के मिळते.
सदस्य खातेदाराच्या मृत्यूवर अवलंबून असलेल्या वडिलांना/आईला पेन्शन दिले जाते, जर कुटुंबाचा किंवा इतर कोणत्याही सदस्याचा नॉमिनी नसेल.
EPS-95 योजनेबाबत जाणून घ्या
EPS-95 या योजनेचे पूर्ण नाव कर्मचारी पेन्शन योजना-1995 आहे.1995 मध्ये सुरू करण्यात आली असल्याने या योजनेला EPS-95 असे नाव देण्यात आले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा संस्थांपैकी एक आहे. ही संस्था आपल्या खातेदारांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना देत असते. अडचणीच्या काळात EPFO च्या योजना आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा