हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pension Scheme : या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. यावेळी अनेक योजनांच्या रिस्क फ्री गुंतवणूकीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांचा आणखी पेन्शन मिळवण्याचा मार्गच मोकळा झाला आहे. यावेळी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या बदल आणि नवीन योजनांनुसार आता वृद्ध जोडप्याला दरमहा 70,000 रुपयांपर्यंतची पेन्शन मिळू शकेल. आता केंद्र सरकारकडून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या (SCSS) गुंतवणूकीची मर्यादा वाढवली आहे. अर्थमंत्र्यांनी विशेषत: महिलांसाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट (MSSC) सुरू केले आहे. Pension Scheme
यासोबतच प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी दुसरी बचत योजना आधीपासूनच सुरू आहे. या सर्व योजनांमध्ये 1.1 कोटी रुपये गुंतवून ज्येष्ठ नागरिक जोडप्याला 70,500 रुपयांची पेन्शन मिळू शकेल. मनीकंट्रोलचा हवाल्याने हे लक्ष्य कसे साध्य करता येईल ते जाणून घेउयात…
कोणत्या योजनेमध्ये किती रिटर्न मिळेल ???
याआधी या योजनेमध्ये कोणत्याही व्यक्तीला जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येत होती. जी आता वाढवून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. जर एखाद्या जोडप्याने यामध्ये 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर यावर सरकारकडून 8 % रिटर्न मिळेल. ज्याचा कालावधी 5 वर्षांचा असेल. या जोडप्याने प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि त्याचा कालावधी 10 वर्षांचा असेल तर यावर 7.4 टक्के रिटर्न मिळेल. Pension Scheme
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये कोणत्याही जोडप्याला एकूण 18 लाख रुपये गुंतवता येतील. त्याचा कालावधी 5 वर्षांचा आहे, ज्यावर 7.1 टक्के रिटर्न मिळेल. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट, जी सरकारची एक नवीन योजना आहे, त्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे आणि यामध्ये दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. यामध्ये 7.5 टक्के रिटर्न मिळेल. आता आपली एकूण गुंतवणूक 1.1 कोटी रुपये असेल आणि यावरील रिटर्न दरमहा 70,500 रुपये पेन्शन देईल. Pension Scheme
टॅक्स आणि लॉक-इन
प्लॅन रुपी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे अमोल जोशी सांगतात की,”या योजना अतिशय आकर्षक आहेत मात्र त्यातील एक कमतरता म्हणजे त्यांच्या रिटर्नवर टॅक्स भरावा लागतो. मात्र, ज्या लोकांकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नाही ते नवीन टॅक्स सिस्टीममध्ये जाऊ शकतात. कारण यामध्ये 7 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक उत्पन्नावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. याचा अर्थ या योजनांमधून मिळणारे व्याज 2 लोकांसाठी टॅक्स फ्री असेल. Pension Scheme
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/Pradhan-Mantri-Vaya-Vandana-Yojana1
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा