पुणे : पुणे शहरात आजपासून अंशतः लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच काही गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहे. यात शहरातील बससेवा देखील 7 दिवस बंद ठेवण्यात आली आहे. भाजपच्या वतीने शहरात पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करावी यासाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहर अध्यक्ष जगदीश मुळे यांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण वाढीचा वेग हा पुणे जिल्ह्यात असल्यामुळे पुणे शहरात अंशतः लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. शहरात आजपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचार बंदी केली आहे तर हॉटेल्स, मॉल्स धार्मिक स्थळ तसेच गर्दी होणारी ठिकाण बंद करण्यात आलेली आहेत. सात दिवस पीएमपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे भाजपच्या वतीने या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. यावेळी भाजाप खासदार गिरीश बापट यांनी स्वारगेट सब डेपो येथे आंदोलन केले. यानंतर पुणे पोलिसांनी बापट यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, त्याच अनुषंगाने आज शहर भाजपच्या वतीने या निर्णयाविरोधात आंदोलन केले आहे. पीएमपी बस सेवा सोबतच हॉटेल्स देखील सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र आंदोलन सुरू होताच पोलिसांनी खासदार गिरीश बापट व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.