नाशिक प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणूक देखील एकत्रित लढणार असल्याने भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांच्या स्वप्नांवर चांगलेच पाणी फेरले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील देवळाली (राखीव ) या मतदारसंघात युतीच्या तिकिटासाठी चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. मात्र भाजप शिवसेनेने ज्या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा आणि शिवसेनेचाही. ते-ते मतदारसंघ त्या-त्या पक्षालाच ठेवले जाणार आहेत असा फॉर्मुला आखला आहे. त्या संदर्भात गिरीश महाजन यांनी वक्तव्य देखील दिले आहे. त्यामुळे आमदार योगेश घोलप यांचा जीव भांड्यात पडला आहे.
माजी आमदार मोहितेंच्या अटकेबद्दल राजगुरूनगरमध्ये शांततेसह दबक्या आवाजात चर्चा
देवळाली मतदारसंघावर मागील ३० वर्षांपासून बबनराव घोलप यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. भष्टाचाराच्या एका प्रकरणात बबनराव घोलप यांना शिक्षा झाल्याने त्यांना ६ वर्ष निवडणूक लढण्यास बंदी आली. त्यानंतर त्यांनी २०१४ साली आपला मुलगा योगेश घोलप याला निवडणुकीच्या रणात उतरवले. या निवडणुकीत भाजप शिवसेना स्वतंत्र लढल्याने निवडणूक चुरशीची झाली मात्र शिवसेनेच्या योगेश घोलप यांनी मैदान राखले. तर यावेळी या मतदरसंघातून लढण्यास भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.
धोनी तू निवृत्त हो ! अन्यथा तुला खेळू दिले जाणार नाही
२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले रामदास सदाफुले हे उमेदवार होते. त्यांनी घोलपांना चांगलीच टक्कर दिली मात्र त्यांना या निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांनी पाच वर्ष या मतदारसंघात चांगलाच संपर्क ठेवून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यांनी जर अपक्ष उमेदवारी दाखल केली तर शिवसेनेच्या घोलपांपुढे मोठे आव्हान उभा राहू शकते. त्यामुळे या मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा