विवाहितेच्या प्रियकराने काढला दुसऱ्या बॉयफ्रेंडचा काटा, केला अपघाताचा बनाव पण…

Relation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

करमाळा : हॅलो महाराष्ट्र – करमाळामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रेयसीचे दुसरीकडे अनैतिक संबंध असल्याने जुन्या प्रियकराने रागाच्या भरात नवीन प्रियकराची हत्या केली आहे. आरोपी प्रियकाराने आपल्या प्रेयसीच्या नवीन बॉयफ्रेंडचा अपघात घडवून त्याची हत्या केली आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी २४ तासांच्या आत हत्येचे गूढ उलगडत त्यांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव विजय काकडे आहे. तो करमाळा तालुक्यातील वडशिवणे या गावचा रहिवाशी आहे. तर संशयित आरोपीचे नाव अक्षय उतरेश्वर ढावरे असे आहे. आरोपी ढावरे याच्या प्रेयसीचे मृत विजय काकडे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आपली प्रेयसी आपल्याला धोखा देत असल्याचा राग मनात धरून अक्षय ढावरेने रविवारी पहाटे मॉर्निग वॉकला गेलेल्या विजय काकडे याची अंगावर पिक अप गाडी घालून चिरडून हत्या केली.पण हा अपघात नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

आरोपी अक्षय ढावरे हा वडशिवणे गावातील सोमनाथ मगर यांच्या पिकअप गाडीवर ड्रायव्हर आहे. त्याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. पण कालांतराने त्या महिलेने अक्षयकडे दुर्लक्ष करून विजय काकडे याच्याशी अनैतिक संबंध जुळवले. हा राग मनात धरून अक्षयने विजयचा पत्ता कट करण्याचे ठरवले. यानंतर त्याने पूर्वनियोजित कट रचून मॉर्निंग वॉकला गेलेल्या विजयचा अपघात घडवून आणला. यानंतर पोलिसांनी पिकअप गाडीचे मालक सोमनाथ मगर यांची चौकशी केली असता त्यांनी हि गाडी आरोपी अक्षयकडे होती, अशी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.